ठाणे

डोंबिवलीत प्रथमच २१ गणपती एकाच वेळी एकाच ठिकाणाहून विसर्जनासाठी निघणार

( शंकर जाधव)
डोंबिवली : डोंबिवलीत प्रथमच फडके रोड येथे गौरी गणपती  २१ गणपती  एकाच वेळी  एकाच ठिकाणाहून  विसर्जनासाठी निघणार आहेत. कलारंग ढोल ताशा पथकाने ‘गणरायाची वारी’ या उपक्रमा अंतर्गत   एकत्रित विसर्जन समारोह आयोजित केला गेला आहे. गणेश सेवेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे या समारोहाचे उद्दिष्ट असून त्यासाठी सर्वानी एकत्र यावे म्हणून केला जाणारा हा एक प्रयत्न आहे. यावेळी  २१ घरगुती गणपतींची भव्य विसर्जन मिरवणूक निघणार असून ढोल-ताशा पथक विसर्जन मिरवणुकीत आपली कला सादर केली जाणार आहे.याप्रसंगी वातावरण चैतन्यमय असेल आणि सोबत बाप्पाच्या नावाचा जयघोष असेल. २१ गणपतींची अशी दिमाखदार मिरवणूक डोंबिवलीत प्रथमच होणार असल्याची माहिती
कलारंग प्रतिष्ठानचे सदस्य नेहाल थोरावडे यांनी सांगितले. ही मिरवणूक शहराचे मुख्य आकर्षण बनणार आहे. या उपक्रमाची  वैशिष्ट्ये आणि कार्यक्रमाचे सविस्तर माहितीसाठी योगेश गोंधळेकर- ९९२०१८९४७४,
मानस भोसेकर- ८८९८६११२९३, नेहाल थोरावडे-९७६९५१५३१२ यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!