ठाणे

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे रेल्वे प्रवास सुखकर होण्यासाठी ५ वर्षांत ३ हजार ३०० कोटींच्या प्रकल्पांची अमलबजावणी

डोंबिवली  :  ठाण्यापुढील लोकसंख्या व रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या पाच वर्षांत तब्बल ३ हजार तीनशे कोटींच्या प्रकल्पांची कामे मंजूर झाली असून ती अमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. यात प्रामुख्याने ठाणे व दिवा दरम्यान पाचव्या – सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम जून २०२०  च्या आधी पूर्ण होणार, यादरम्यान लोकलच्या ५०  हून अधीन फेऱ्यांमध्ये वाढ होणार असून अंबरनाथ व कोपर स्थानकांतील होम प्लॅटफॉर्मचे काम मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे.
कोपर स्थानकात ठाणेकडील पादचारी पूल व डोंबिवली स्थानकातील कल्याणकडील पादचारी पुलाचे काम पावसाळा संपताच सुरू करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी काल आयोजित विभागीय रेल्वे बैठकीत दिली. उपनगरी रेल्वेच्या फेऱ्या वाढवून प्रवाशांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या कल्याण यार्ड रिमॉडेलिंगच्या प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार, असा प्रश्न खा. डॉ. शिंदे यांनी उपस्थित केला असता या प्रकल्पाचे सविस्तर अंदाजपत्रक बनवण्याचे काम पूर्ण झाले असून वास्तविक काम सहा महिन्यात सुरु होणार व त्यामुळे एक्सप्रेस व लोकल गाड्यांचे सेग्रीगेशन होऊन लोकल गाड्यांचे फेऱ्यांमध्ये वाढ होऊन सदर कामाचे एमयूटीपी-३ए अंतर्गत या प्रकल्पासाठी 961.25 कोटी मंजूर झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी आपण सातत्याने मागणी करत असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले असता एमयूटीपी-३ए अंतर्गत 12 डब्यांच्या सर्व गाड्या 15 डब्यांच्या करण्यात येणार असल्याचे जैन यांनी सांगितले. मुरबाड बी. जी. नवीन लाईनकरिता 726.46 कोटी रुपयांची रेल्वे बोर्डकडून  मंजुरी देण्यात आली असून लवकरच सदर प्रकल्पास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती देखील सदर बैठकीत देण्यात आली.आपल्या मागणीनुसार कल्याण व डोंबिवली स्थानकांचा पुनर्विकास पीपीपी तत्त्वावर करण्यास रेल्वेने मंजुरी दिली असून या प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत डॉ. शिंदे यांनी विचारले असता एमयूटीपी 3 ए व इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण व डोंबिवली या स्थानकांसह कळवा, मुंब्रा, ठाकुर्ली, उल्हासनगर, अंबरनाथ व शहाड या स्थानकांचाही कायापालट होणार असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले. चिखलोली स्थानकाच्या कामासाठी सविस्तर अंदाजपत्रक बनवण्याची व चित्रीकरणीचे काम सुरू असल्याची माहिती जैन यांनी दिली. या बैठकीस खा. डॉ. शिंदे यांच्यासह राजन विचारे, राजेंद्र गावित, राहुल शेवाळे, कपिल पाटील, विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन व अन्य वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!