महाराष्ट्र

पालघर जिल्हात जिल्हा स्तरीय तंबाखुमुक्त कार्य शाळा संपन्न

   पालघर :   देशात कर्करोगाचे प्रमाण  दिवसेंदिवस वाढत आहे आजारांच्या यादीत कर्करोग महत्वाचा आजार म्हणुन समोर येत आहे भारतात लाखो कर्करोग पीडित रुग्ण आढळतात त्यात दरवषी हजारों नवीन रुग्णांची भर पडत आहे. एक अहवालानुसार बालकांमध्ये ककरोगाच्या प्रमाणात दरवषी मोठी वाढ होत आहे  तंबाखु  व तंबाखुजन्य पदार्थाच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे, तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्या सह शिक्षणावरही होत आहे त्यामुळे आता जिल्हातील शाळा तंबाखुमुक्त करण्याचा निर्धार करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने कार्यशाळेचे आयोजन सलाम मुंबई फांउडेशन, , प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र आणि जि.प.पालघर शिक्षण विभाग, नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथे २९/८/२०९ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा  जि.प.संकुल सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती.
                        प्रशिक्षणा करीता प्रत्येक तालुक्यातुन गटशिक्षाणधिकारी व तालुक्यातील पाच तज्ञ मार्गदर्शक  नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व सलाम मुंबई फाउंडेशन तर्फे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणापूर्वी सर्व उपस्थितांनी तंबाखू मुक्त शाळा करण्याची शपथ घेतली.  प्रशिक्षणानुसार कुठल्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू सेवन करताना कोणीही व्यक्ती आढळल्यास 2003 च्या कलम 24 नुसार सदर व्यक्तीस 200 रु दंड करता येईल.तसेच प्रत्येक शाळेच्या आवारात जनजागृती चे तीन बॅनर लावले जातील,तसेच ज्या शाळा तंबाखू मुक्तीचे 11 निकष पूर्ण करतील त्या शाळा तंबाखू मुक्त होतील. अशी माहिती सलाम मुंबई चे महाराष्ट्र समनव्यक अजय पिलणकर यांनी दिली. तसेच येत्या 2 आक्टोबर पर्यन्त जिल्ह्यातील सर्व शाळा नाही  निदान इथे बसलेल्या सर्व शिक्षकांनी तरी आपल्या शाळा तरी तंबाखू मुक्त करण्याचा निश्चय केला पाहिजे, यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.केळकर  यांनी उपस्थितांना तंबाखू मुळे होणाऱ्या दुष्परिणाम व शाळेत जनजागृती कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले.
                     कार्यक्रमास  सलाम मुंबई चे जिल्हा समन्वयक जयेश माळी व सलाम मुंबई फांउडेशन चे  प्रतिनिधी , नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद   पाटील  राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम चे प्रतिनिधि उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!