ठाणे

उद्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे डोंबिवलीत

 डोंबिवली : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रेचे उद्या बुधवारी डोंबिवलीत आयोजन करण्यात आले आहे.यावेळी शिवसेना नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, महापौर विनिता राणे, नगराध्यक्ष मनीषा वाळेकरआमदार सुभाष भोईर, आमदार बालाजी किणीकर आदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी अडीच वाजता सुयोग हॉटेल येथून यात्रा सुरु होणार असून घरडा सर्कल, टिळक पुतळा, मदन ठाकरे, इंदिरा चौक, गावदेवी मंदिर असा यात्रेचा मार्ग असणार आहे.सायंकाळी साडे चार वाजता इंदिरा चूक येथे जन संवाद आयोजित केले आहे. सायंकाळी ६ वाजता होरायझन सभागृहात विजय यात्रा मेळावा घेण्यात येणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

Advertisements

मुंबई

कोकण

error: Content is protected !!