ठाणे

कल्याण- डोंबिवलीत एका तासात एक टन प्लॅस्टीक गोळा..

डोंबिवली : ( शंकर जाधव  ) प्लॅस्टीक पिशव्यावर बंदी असताना पालिका प्रशासनाने काही दिवस  दिखाव्याची कारवाई केली. मात्र त्यानंतर हि कारवाई थंड पडल्याने फेरीवाल्यांकडून रस्त्यावर सर्रासपणे प्लॅस्टीकच्या पिशव्या विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रानेच देशात स्वच्छ भारत अभियनाची हाक दिली असल्याने पालिका प्रशासनाने प्लॅस्टीक बंदी मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे.मंगळवारी पालिकेने केलेल्या कारवाईत कल्याण- डोंबिवलीत एका तासात एक टन प्लॅस्टीक गोळा केल्याची माहिती `फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांनी दिली.
या मोहीमेत मंजुनाथ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि पर्यावरण दक्षता मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे या मोहिमेत एकदा वापरलेले प्लॅस्टीक पुन्हा वापरू नये, तसेच  प्लॅस्टीकच्या पिशव्या विकत घेऊ नये यासाठी जागृती करण्यात आली. पालिका प्रशासनाने मंगळवारी ‘फ’ प्रभागात केलेल्या कारवाईत एका तासात एक टन प्लॅस्टीक गोळा करण्यात आले.या संदर्भात पालिकेच्या डोंबिवली विभागाचे सहाय्यक सार्वजनिक आरोग्याधिकारी विलास जोशी यांना विचारले असता पालिकेत पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे सांगत १६ लाख नागरिकांसाठी केवळ १९०० कामगार काम करत असल्याची माहिती दिली.`फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी दिपक शिंदे म्हणाले, एक जुलै रोजी शासनाने प्लॅस्टीक मुक्ती संदर्भात शासकीय ठराव  जाहीर केला आहे.त्यानुसार आयुक्तगोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॅस्टीकमुक्ती मोहीम ११ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरच्या दरम्यान राबविण्यात येणार आहे.प्रमुख आरोग्य निरीक्षक वंसत डेगलूरकर, कर अधीक्षक वाघचौरे आदी  अधिकारी आणि मनपा कर्मचारी सहभागी झाले होते.

     कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रात १० प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून किमान १ टन प्लॅस्टीक गोळा केले जात आहे. प्लॅस्टीक वापरू नका असा संदेश देऊन घराघरातही अनेक नागरिक प्लॅस्टीकचा वापर सर्रासपणे करताना दिसतात. तर स्वायवॉकवर बसणारे फेरीवाले तर प्लॅस्टीकच्या पिशव्या रस्त्यावरच फेकून देतात. यामुळे नाल्यांमध्ये प्लॅस्टीक अडकल्याने पुरपरिस्थिती निर्माण होत असून हा अत्यंत गंभीर विषय आहे. तर पर्यावरण दक्षता मंच डोंबिवली शाखेच्या रूपाली शाहीवले यांनी पुढील पिढीचे नुकसान होत सांगितले.मात्र प्लॅस्टीक बंदी होऊन दीड वर्ष लोटले तरी शहरातील विक्रेत्यांकडे प्लॅस्टीक येतेच कुठून असा सवाल सर्वत्र विचारण्यात येत आहे. या संदर्भात विक्रेत्यांशी चर्चा केल्यानंतर डोंबिवलीकर नागरिक वस्तु किंवा भाजी विकत घेताना प्लॅस्टीक पिशव्यांची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर पुन्हा वाढतच चालल्याची कबुली एका विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तर  काही विक्रेत्यांनी मुळात प्लॅस्टीक बनविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत प्लॅस्टीक वापरणे पूर्णपणे टाळता येणार नसल्याचे सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!