ठाणे

आगासन गावातील ‘धवळारीन’ बारकूबाई सत्यवान मुंडे यांचे निधन

दिवा :   आगरी समाजात लग्न कार्यात धवळारनिला विशेष सन्मान असतो. ‘धवळारीन’ म्हणजे लग्नाच्या सुरवातीपासून शेवटपर्यत गाव कारभाऱ्यांच्या जोडीने पारंपरिक पद्धतीने सर्व रीतिरिवाज , प्रथा सांभाळून लग्नकार्य पार पडणाऱ्या अनुभवी स्त्रिया ,अश्याच पद्धतीने आगासन गावात धवळारीणीचे काम योग्य रीतीने पार पडणाऱ्या मनमिळाऊ व्यक्तिमत्व सर्वाचे आदरतिथ्य करणाऱ्या बारकूबाई सत्यवान मुंडे यांचे रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आगासन येतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . आतिशय प्रेमळ स्वभाव म्हणून  त्यांची आगासन गावात ख्याती होती .
त्याच्या पश्चात तीन मुले , दोन मुली , सुना नातवंडे असा परिवार आहे
त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक १  आक्टोबर रोजी आगासन खाडीवरील गणेश घाट येथे करण्यात येणार आहे. तर तेरावा विधी [उत्तरकार्य ]   शुक्रवार दिनांक  ४ आक्टोबर रोजी ओम त्रिनेत्र बंगला शिव मंदिर रोड आगासन ता.जि.ठाणे येथे करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!