ठाणे

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी केले डोंबिवली स्टेशनची साफसफाई

डोंबिवली ( प्रतिनिधी ) राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त हॉली एंजल शाळेच्या विद्यार्थ्यांनी डोंबिवली स्टेशनची साफसफाई करून स्वच्छतेच संदेश दिला. तिकीट खिडकी, स्कायवॉक, रेल्वे पुल या परिसराची विद्यााथ्र्यानी साफसफाई केली. यावेळी विद्यााथ्र्यांनी साफसफाई केल्याचा वेगळा अनुभव मिळाल्याचे सांगितले.
विद्यार्थी हातात झाडू घेऊन डोंबिवली स्टेशन स्टेशन साफसफाई करताना होळी एंजल शाळेचे संचालक डॉ. ओमेन डेवीड, मुख्याध्यापिका राफत शेख, क्रीडा शिक्षक राजीव घुले,स्टेशन प्रबंधक अब्राहम,डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी जावळे,रेल्वे कर्मचारी हनुमंते आदि उपस्थित होते. दुसरीकडे स्वच्छता ही सेवा ही मोहीम कल्याण – डोंबिवली पालिकेच्यावतीने राबविण्यात आली. बुधवारी सकाळी डोंबिवली पश्चिमेतील गांधी उद्यानातील महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डोंबिवली महापालिका कार्यालयापासून एक रॅली काढण्यात आली. ही रॅली मानपाडा रोड मार्गे, गावदेवी मंदीर, सत नामदेव पथ, पाथर्ली रोड, शेलार चौक, कल्याण रोड मार्गे पंचायत बावडी, शंकर शेठ कोड़, सम्राट चौक, दिनदयाळ रोड द्वारका हॉटेल ते महात्मा गांधी उद्यान येथे या रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीत परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत शपथ देण्यात आली. प्लॅस्टीकमुक्त अभियानात सहभागी झालेल्या उपस्थितांना पालिका अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमात महिला बचतगट, पर्यावरण दक्षता मंच, पी.जे. आर अ‍ॅग्रो सोल्युशन, सक्षम नारी सेवाभावी संस्था, विवेकानंद संस्था, प्रगती महाविद्यााचे विद्यार्थी आणि बीट मार्शल सहभागी झाले होते. यावेळी पालिका अधिकारी उपायुक्त मारूती फडके, आरोग्य अधिकारी विलास जोशी, प्रमुख आरोग्य निरीक्षक वसंत डेग्लूरकर , प्रभाग अधिकारी दिपक शिंदे, चंद्रकांत जगताप, ज्ञानेश्वर कंखरे, रविंद्र गायकवाड , प्रशांत शिंगडे, राजेंद्र खैरे हे अधिकारी उपस्थित होते. यावेळी १ टन प्लॅस्टीक गोळा करण्यात आले. दरम्यान डोंबिवली स्थानक येथे हॉली एंजल शाळेच्यावतीने स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली स्थानकावरील फलाट, तिकीट खिडकी, स्कायवॉक, रेल्वे पुल या परिसराची विद्यााथ्र्यानी साफसफाई केली. यावेळी विद्यााथ्र्यांनी साफसफाई केल्याचा वेगळा अनुभव मिळाल्याचे सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!