ठाणे

डोंबिवली विधानसभा मतदार संघासाठी मनसे उमेदवार मंदार हळबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

 डोंबिवली :- ( शंकर जाधव  )डोंबिवली मनसेचे  अधिकृत उमेदवार मंदार हळबे यांनी  १४३ डोंबिवली विधानसभा  मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार यांच्याकडे आपला नामनिर्दशन पत्र दाखल केले.यावेळी विरोधी पक्ष नेते तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर,  महिला शहर अध्यक्षा मंदा पाटील, राहुल कामत आणि गिरीश साळवी उपस्थित होते.
    यावेळी मंदार हळबे म्हणाले, आज डोंबिवलीची अवस्था काय झाली आहे हे सर्वांना माहित आहे, ती कोणामुळे झाली आहे हेही माहित आहे. हे चित्र बदलण्यासाठी मनसे हा एकमेव पक्ष आहे.डोंबिवलीत परिवर्तन नक्की होणार. डोंबिवलीकरांमध्ये  युतीबाबत असंतोष आहे. 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!