डोंबिवली ( शंकर जाधव ) शिवसेना -भाजपचे अधिकृत उमेदवार रमेश म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.नितीन महाजन यांच्याकडे दाखल केला. यावेळी यांच्यासमवेत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,महापौर विनिता राणे, नितीन नांदगावकर,भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब उपस्थित होते. गुरूवारी खासदारांनी रमेश म्हात्रेच अधिकृत उमेदवार असल्याचे गुरूवारीच जाहिर केले होते.यावेळी नांदगावकर यांना शिवेसेनेच्या प्रवेशाबाबत विचारले असता त्यांनी स्वगृही परतल्याची भावना व्यक्त केली तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुभाष भोईर जरी नाराज असले तरी पक्षश्रेष्ठी त्यांना जरूर न्याय देतील असे मत व्यक्त केले.
शिवसेना -भाजपचे अधिकृत उमेदवार रमेश म्हात्रे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
October 4, 2019
454 Views
1 Min Read

-
Share This!