ठाणे

कल्याण – डोंबिवली विधानसभा निवडणुकीत तीन महिला उमेदवारांना संधी…. आघाडीकडून दोन तर एक अपक्ष महिला उमेदवार..

डोंबिवली  ( शंकर जाधव ) कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व , कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या चारविधानसभा मतदार संघात विविध राजकीय पक्षांनी तगडे उमेदवार दिल्याने या यामध्ये चांगलीच लढत होणार आहे. या चारहि विधानसभा मतदार संघात तीन महिलांना उमेदवारी दिली आहे. यात कॉंग्रेसने दोन मतदारसंघात तर कल्याणमध्ये एक महिला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे.शिवसेना, भाजप यांनी दोन्ही पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली नाही.

        कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस परतीची आघाडी झाल्याने कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व या दोन्ही विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसने यंदा महिलांना उमेदवारी दिली. तर कल्याण पूर्वेतून जागरूक नागरिक मंचने महिला उमेदवार दिला आहे. डोंबिवली विधानसभा मतदार संघातून आघाडीने राधिका गुप्ते व कल्याण पूर्वेतून कांचन कुलकर्णी यांनी या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत.तर जागरूक नागरिक मंचने साजिथा नायर यांनी विधानसभेत सामान्य नागरिकांचा आवाज विधानसभेत एकू यावा प्रथमच उभ्या आहेत. तर आघाडीने डोंबिवलीतून राधिका गुप्ते आणि कल्याण पूर्वेतून कांचन कुलकर्णी यांना संधी दिली.कल्याण-डोंबिवलीतील सद्यस्थिती पाहता आता राजकीय नको तर सामान्य नागरिक ह्या समस्या सोडविण्यासाठी पुढे येत आहेत. डंपिंग ग्राउंड, अनधिकृत बांधकामे,निकृष्ट दर्ज्याचे रस्ते, प्रदूषण, रेल्वेचा जीवघेणा प्रवास, यासारख्या अनेक समस्या सोडविण्यास कमी पडले आहेत. जागरूक नागरिक मंचाने यावर उपोषण. आंदोलने केली.प्रशासनाला जागे करण्याचे काम आम्ही करत आहोत असे नायर यांनी सांगितले. तर कांचन कुलकर्णी यांनी आघाडीलाच यावेळी जनता पसंती दर्शवतील असे सांगितले.

   दरम्यान आघाडी आणि जागरूक नागरिक मंच यांनी महिलांना संधी दिली असली तरी शिवसेना- भाजप यांनी मातब्बर नेते मंडळींना उमेदवारी देऊन आपल्या पारड्यात जनतेची जास्तीत जास्त मते कशी मिळतील आणि याचा पक्षाला फायदा कसा होईल याचा विचार केल्याचे दिसते. तर इतर घटक पक्षांनी या चारही  विधानसभा क्तदार संघात महिला संधी देण्यासाठी युतीकडे आग्रही भूमिका का घेतली नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!