ठाणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ए बी फॉर्म वरिष्ठांना डावलून कसा देण्यात आला? चौकशी करणार – सदा पाटील!

राकापाची आघाडी धर्मामुळे माघार, पण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां मध्ये खदखद?

काँग्रेस उमेदवाराला भोवणार अंतर्गत धूसफूस?

उल्हासनगर (गौतम वाघ) : आधीच राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवक्ते पदी असलेले महेश तपासे, ह्यांना २००९ मध्ये ३०,००० वर मतदान आणि त्यानंतर ही २०१४ मध्ये बर्‍यापैकी मतदान झाल्याने, त्यांच्या सुप्त इच्छा जागृतच होत्या आणि तशी स्पष्टीकरण त्यांनी टिव्ही चॅनलवर व्यक्त ही केले होते.आणि त्यातच उल्हासनगर विधानसभेतून तिकीट कापल्या गेलेले भरत राजवानी (गंगोत्री), अत्यंत नाराज असतांना, ह्या दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांचा व त्यांच्या सह कार्यकर्त्यांचा हिरमुसलेपणा, कॉंग्रेस च्या उमेदवारास भोवणार असल्याची चर्चा सध्या जोरात असल्याने, आघाडीतील बेकी संदर्भात दोन्ही गटात अस्वस्थता दिसून येत आहे.
अंबरनाथ विधानसभा क्षेत्राच्या निवडणूकीत राष्ट्रीय कांँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आणि पिआरपी पार्टी चे उमेदवार रोहीत साळवे यांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तोंडातला घास काढून तिकीट देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण खरात यांनी पक्षाचा अधिकृत ए बी फॉर्म लावूनच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. फॉर्म माघार घ्यायच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच ७ तारखेपर्यंत त्यांनी माघार तर घेतली नाहीच उलट मोबाईल बंद करून ठेवला. याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे निवडणूक लढविण्याचेच त्यांचे मनसुबे होते. पण ८ तारखेला अचानक पणे अंबरनाथ आणि उल्हासनगर ह्या दोन्ही ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन प्रविण खरात यांनी माघार घेतली असल्याचे सांगितलं.फॉर्म माघार घेण्यास उशीर झाल्याचे थातूरमातूर कारण पुढे करून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर खरात यांनी, कॉंग्रेस च्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे जरी तोंडवळणी सांगितले असले तरी मनातून मात्र त्यांची नाराजी चेहर्‍यावरून लपवणे शक्य झाल्याचे दिसून येत नव्हते. तशाच प्रकारे उल्हासनगर मतदारसंघातून ए-बी फाॅर्म सह उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भरत राजवानी (गंगोत्री), हे पक्षाचे प्रदेश चे पदाधिकारी आहेत. पण राकापा पक्षाच्या प्राथमिक सदस्यता व शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार्‍या ज्योती कालानी यांनाच पुन्हा अधिकृत तिकिट देण्यात आल्याने, गंगोत्री यांचा अक्षरशः पोपट करण्यात आला. त्यामुळे एकदम निवडणुकीत आपली ताकद पणाला लावण्याच्या उद्देशाने रणांगणात उतरलेल्या गंगोत्रींचा त्यांच्या विरोधकांकडून पार पानउतारा झाला. त्यामुळे कालानी परिवारावरचे प्रेम राष्ट्रवादी कांँग्रेस पार्टी चे कधीच संपु शकत नाही, याचा पुरेपूर अंदाज त्यांना ह्यावेळी आला. अत्यंत उद्विग्न मनस्थितीत असलेले गंगोत्री सध्या निवडणुकीच्या वार्‍याला ही उभे राहणार नसल्याने, त्यांच्या कडून अपमान पचवून कॉंग्रेस ला पाठिंबा देण्याची शक्यता दुर्मिळच वाटते.विशेष म्हणजे कँम्प-४ आणि ५ चे मित्रपक्ष साई पाटिॅचे सर्वच नगरसेवक सेना-भाजप चे अधिकृत उमेदवार डॉ.बालाजी किणीकर यांच्या सानिध्यात आहेत.
त्याच बरोबर राकपा चे अंबरनाथ मधील कार्यकर्ते देखील ह्या कॉंग्रेस च्या वाटेने गेलेल्या, स्थानिक नसलेल्या उमेदवारीमुळे नाराज आहेत. ही सगळी नाराजी मोडून काढण्याचे आव्हान कॉंग्रेस उमेदवाराच्या वाटेवर असतांना, प्रचार करायचा की ही नाराजी दूर करत बसायचे, अशी अवस्था झाल्याची चर्चा सध्या विधानसभा क्षेत्रात जोरदारपणे होत आहेत. त्यातच अंबरनाथ शहराध्यक्ष सदा पाटील यांनी, पक्षा चा ए – बी फॉर्म हा वरिष्ठांना न कळताच कसा देण्यात आला, ह्याची चौकशी ची मागणी करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितल्याने, अजूनच घोळ माजला असल्याचे चित्र उमटले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!