ठाणे

युवक कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रातीलगड-किल्ले दुरुस्ती करून पर्यटनाला चालना देण्याचे आश्वासन …..

  डोंबिवली : ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील गड-किल्ले हा विषय प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा विषय आहे. मात्र भाजप सरकारने  गड-किल्ल्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे युवक कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रातील गड-किल्ले दुरुस्ती करून पर्यटनाला चालना देऊ असे आश्वासन आघाडीच्या उमेदवार राधिका गुप्ते यांनी डोंबिवलीत पत्रकार परिषदेत केला.यावेळी महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

      डोंबिवली पश्चिमेकडील कॉंग्रेस कार्यालयात आघाडीचे उमेदवार राधिका गुप्ते,कॉंग्रेसचे गटनेते नंदू म्हात्रे,माजी नगरसेवक जितेंद्र भोईर,एकनाथ म्हात्रे,हृदयनाथ भोईर, डोंबिवली विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष पमेश म्हात्रे, गणेश भोईर, गायत्री सेन,बेबी परब,अशोक कापडणे,अभय तावडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचा जाहीरनाम्यात शिक्षण, रोजगार,सशक्तीकरण,आरोग्य आणि जीवनशैली यावर भर देण्यात आला.सुशिक्षित बेरोजगारांना प्रतीमहिना ५ हजार रुपये भत्ता आणि सुमारे दोन लाख रिक्त सरकारी नोकऱ्यांची भरती पहिल्या १८० दिवसात पूर्ण करणार, स्वतंत्र युवक कल्याण विकास मंत्रालय स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यात युवा माहिती केंद्र स्थापन करू, महापारीक्षा पोर्टल तत्काळ बंद करू, ३० सप्टेंबर २०१९ पर्यत घेतलेली सर्व शैक्षणिक कर्जे माफ करण्यात येईल, दिव्यांग युवकांसाठी विनामुल्य उच्च शिक्षण, शेतकरी कुटुंबियांतील मुलांना उच्च शिक्षणासाठी राज्य सरकार बँक हमी योजना, पदवीपर्यत सर्व विद्यार्थ्यांना विनामुल्य सार्वजनिक वाहतूक सेवा या अश्या अनेक योजना असल्याची माहिती डोंबिवली विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष पमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या जाहीरनाम्यात महाराष्ट्रातील गड-किल्ले दुरुस्ती करून पर्यटनाला चालना देण्याचे आश्वासन उमेदवार राधिका गुप्ते यांनी यावेळी दिले. युवकांबाबत कॉंग्रेसचे पाउलं पाहता डोंबिवलीत मात्र महिला असुरक्षित असल्यावर युवक कॉंग्रेसने आजवर काय केले असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता आम्ही महिला सुरक्षिततेसाठी भूमिका घेतली आहे. परंतु इतर पक्षाप्रमाणे प्रसिद्धी घेतली नाही असे उपस्थित महिला पदाधिकाऱ्या सांगितले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!