क्रिडा

१५ व्या  ट्राम्पोलिन आणि टंबलिंग जिम्नॅस्टिक्स स्टेट चॅम्पियनशिप २०१९-२० मध्ये भोईर जिमखान्याला सुयश..

 डोंबिवली : ( शंकर जाधव  )   १५ वी ट्राम्पोलिन आणि टंबलिंग जिम्नॅस्टिक्स स्टेट चॅम्पियनशिप २०१९-२० श्रवण स्पोर्ट्स कॉम्लेक्स ‘ इरा ग्लोबल स्कूल येथे पार पडल्या. ह्या स्पर्धा महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संस्था अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा आणि जिल्हा जिम्नॅस्टिक स्पर्धा, जिम्नॅस्टिक असोसिएशन ठाणे, भोईर जिमखाना व श्रवण स्पोर्ट्स अकॅडमी यांनी संयुक्त विद्यामाने पार पडली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २० जिल्हातुन ३०० खेळाडू  तसेच ५० पंच आणि प्रशिक्षक यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच शिवछत्रपती पुरस्कारारर्थी यांनी उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवली. माजी आमदार रमेश पाटील आणि भोईर  जिमखान्याचे संस्थापक मुकुंद भोईर यांनी स्पर्धेचे मुख्य आयोजन प्रामुख्याने पार पाडले. हया स्पर्धच्या संचालनाची संपूर्ण जबाबदारी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पवन भोईर यांनी पार पडले. हया स्पर्धेत भोईर जिमखान्यातील खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले. एकूण १३ सुवर्ण, ३० रौप्य, १४ कांस्य,एवढी पदके मिळवली.आदर्श भोईर, सेजल जाधव,आदित्य हिंगणे,हशा मुणगेकर,सिद्धी ब्रीड,श्रेयस चौधरी आणि राही पाखले यांनी सुवर्ण पदक मिळवले.स्पर्धेतील सर्व विजेते खेळाडूंचे ठाणे जिल्हा जिम्नॅस्टिक अससोसिएशचे अध्यक्ष व भोईर जिमखान्याचे संस्थापक मुकुंद भोईर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव मकरंद जोशी व कोषाध्यक्ष पवन भोईर यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पार पाडली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!