ठाणे

उंबर्ली गावातील लहान मुलांचा प्रचारात सहभाग

   डोंबिवली :  निवडणुकीत वेगवेगळ्या`आयडिया`चा प्रचारात अवलंब केला जात असतो. यंदा चक्क लहान मुलांनी प्रचारात सहभाग घेतला आहे.डोंबिवली जवळील उंबर्ली गावात कल्याण ग्रामीण मधील महायुतीचे उमेदवार रमेश म्हात्रे यांचा प्रचार लहान मुले करत असल्याचे दिसले.

         शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे उमेदवार रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी मतदारांशी विविध माध्यमातून प्रचार करत आहेत. निळजेगावपलावालोढा कासारियोकोळेगावखोणीअंतर्ली यागावांतर्गत प्रचारादरम्यान उंबर्ली गावातील लहान मुलांनी प्रचार केला. रणरणत्या उन्हात देखील उमेदवार रमेश म्हात्रे त्यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते विशेषतः महिला आघाडी कार्यकर्त्यांसोबत घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संपर्क ठेवीत असल्याचे समझते. प्रचारफेरी दरम्यान कोळेगाव येथे रमेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत पुलाजी केशव काळण यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला.याप्रसंगी  तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रेविधानसभा क्षेत्रप्रमुख एकनाथ पाटीलग्रामीण विधानसभा संघटक कविता चौधरीशिल्पा मोरेडॉ. सुनिता पाटीलनिळजे विभागप्रमुख सतीश पाटील व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

Advertisements

मुंबई

कोकण

error: Content is protected !!