ठाणे

भिवंडीत माजी नौदल सैनिकाचा व्यायाम करताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू.

भिवंडी, (संतोष पडवळ) : आताच्या या फॅशन विश्वात जर राहायचं असेल तर फिट आणि आरोग्यदायी असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळेच जण जिम वेडे पाहायला मिळतात. पण जिम करताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील आताही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय नौदलात सेवा बजावून निवृत्त झालेल्या माजी सैनिकाचा जिममध्ये व्यायाम करताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना काल्हेर इथे घडली आहे.

भिवंडीत माजी नौदल सैनिकाचा जिममध्ये व्यायाम करताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. जितेंद्र शांताराम पाटील ( 45 रा. काल्हेर ) असं मृत्यू झालेल्या माजी नौदल सैनिकाचे नांव आहे. सदर सैनिकाने लष्करी सेवा नियमानुसार 15 वर्षे भारतीय नौदलात सेवा बजावून निवृत्ती स्वीकारली होती. त्यानंतर त्यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी पत्करली होती.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!