ठाणे

गुडविन ज्वेलर्सचे गुंतवणूकदारांची  शनिवारी  २६  ला दुकानासमोर बैठक 

  डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील प्रसिद्ध” गुडविन ज्वेलर्सचे ” दुकान रविवार पासून दोन दिवस दुकान बंद राहील असा बोर्ड लावून बंद करण्यात आले मात्र आठवडा झाला तरी दुकान अजून उघडण्यात आले नाही यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत सर्व गुंतवणूकदारांची सभा शनिवार २६ रोजी सकाळी साडे दहा वाजता दुकानासमोर बोलावली आहे.

     गुंतवणूक दारांनी गुडविन दुकानावर एक बोर्ड लावला असून सर्व गुतावणूकदारांनी सभेला उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे गेल्या वर्षी याच परिसरातील “प्रथमेश ज्वेलर्स “दुकानाचे मालक असेच अचानक परागंदा झाले होते त्याचा ठावठिकाणा अद्याप लागला नसताना आता प्रसिद्ध गुडविन ज्वेलर्स मालक  सुनीलकुमार व सुदेशकुमार असून त्याची एकूण १३  दुकाने असल्याचे सांगण्यात आले गुडविन जवेर्स ऐन दिवाळीच्या तोंडावर गायब झाला यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत आणि म्हणून आशा गुंतवणूकदारांनी शनिवारी सभा बोलावली आहे जवेर्स फरार झाल्यास गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होणार आहे. मानपाडा रोडला स्टेशनपासून जवळच असलेल्या एका इमारतीच्या तळ अधिक हिल्या मजल्यावर या ज्वेलरने दुकान थाटले आहे. दोन वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करत स्थानिक नेत्यांच्या हस्ते त्या ज्वेलरने सोन्याचांदीची पेढि  उभी केली. दागिन्यांसह हा ज्वेलर सोने तारण कर्ज आणि ठेवींचा व्यवसाय करत असे  या ज्वेलरच्या दुकानात २५-३० कामगारांचा ताफा काम करत आहे. हे कामगार डोंबिवलीतील अनेक नागरिकांना फोन करून आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यासाठी गळ घालत असत.मात्र मंगळवारी सकाळी उघडलेले हे दुकान दुपारी अचानक बंद करण्यात आले.या दुकानच्या बंद शटरवर हे दुकान दोन दिवस बंद राहण्याचे कागद चिकटविण्यात आल्याचे दिसून आले. इतके दिवस वाट बघून आता गुंतवणूकदार संघटित होत आहेत.

या संदर्भात रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अहिर यांना विचारले असता त्यांनी अजून कोणताही गुन्हा वा तक्रार दाखल नाही ,तक्रार दाखल होताच दाखल करून कारवाई करू असे त्यांनी सांगितले पोलिसांची भूमिका संशयाची असून दुकान बंद आहे मात्र ते तक्रार दाखल होण्याची वाट बघत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!