महाराष्ट्र

छट महापर्व तेजस्वी परंपरा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबईदि. 2 : आपल्या देशाला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली असून सूर्यपुजनाचे विशेष महत्व असणारे छट महापर्व ही त्यापैकीच एक तेजस्वी परंपरा असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

छट उत्सव महासंघातर्फे जुहूबीच, अंधेरी येथे छट पुजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार अमित साटम, श्वेता शालिनी, मनीष झा व मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, आपल्या देशाला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली असून विविध सण, उत्सव हे त्याचेच प्रतिक आहेत. निसर्गातील विविध शक्तींचे पूजन आपल्या संस्कृतीत केले जाते. छट महापर्वालाही मोठी परंपरा आहे. यामध्ये सूर्यपुजनाचे विशेष महत्व आहे. उगवत्या सूर्याबरोबरच मावळत्या सूर्याच्या पूजनाचे महत्वही नमूद करण्यात आले आहे. देशभर हे महापर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जात असल्याचेही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

यावेळी छट उत्सव महासंघातर्फे या महापर्वानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!