ठाणे

थेट जनतेतून होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता सदाशिव (मामा) पाटील यांची निवड

* कार्यकर्त्यांनी केली निवड; शामदादा गायकवाड यांनी दिला पाठींबा 
* अंबरनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक महत्वपूर्ण बैठक संपन्न
 अंबरनाथ दि. ११ (नवाज अब्दुल सत्तार वणू)
           अंबरनाथ विधानसभा मतदार संघ हा काँग्रेस पक्षाकडे गेला होता, काँग्रेस हा मित्र पक्षच होता, त्यामुळं विधानसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम केले होते. तसेच येणारी अंबरनाथ नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार असल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला सोडायला हवी, नक्कीच राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि नगराध्यक्षपदाकरिता सदाशिव पाटील यांची कार्यकर्त्यांनी निवड केली असून आरपीआय सेक्युलरचे श्याम गायकवाड यांनी पक्षाचा त्यांना पाठींबा दर्शविला आहे.
येत्या अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबरनाथ शहर व आरपीआय (सेक्युलर) मित्र पक्षाची “महत्वपूर्ण बैठक” अंबरनाथ पूर्वेकडील ब्राम्हण हॉल, वडवली सेक्शन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांनी केले होते.
या बैठकीला राष्ट्रवादीचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, आरपीआय (सेक्युलर)चे राष्ट्रीय अध्यक्ष शामदादा गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनील अहिरे, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष पुष्पराज गायकवाड, बळीराम साबे (काका), कमलाकर सूर्यवंशी, नगरसेविका वृषाली पाटील, महिला शहराध्यक्ष पूनम शेलार, प्रिसिला डिसिल्वा, स्वाती पवार, कलाताई म्हेत्रे, जया गाजरे, युवती शहराध्यक्षा ऐश्वर्या मोटे, माजी नगरसेवक कबीर गायकवाड, बाळूमामा सूर्यराव, भगवान महाजन, भीमराव सूर्यवंशी, सोशल मीडिया सेलचे मिलिंद मोरे, विनोद शेलार,प्रवीण पाटील, सूर्यकांत जाधव, नामदेव गुंडाळे, बाळासाहेब पाटील, प्रमोद बोराडे, संजय सरोदये, धनंजय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तयारी करा, आघाडी होईल, नाही होईल,  पण राष्ट्रवादी आणि आरपीआय सेक्युलरची आघाडी हि एक हजार टक्के आहे हि काळ्या दगडावरची रेस आहे. तसेच सन २०१५ मध्ये आरपीआय हि राष्ट्रवादीसोबत होती आणि पुढेही ती कायम राहणार आहे. मी शहराध्यक्ष झाल्यानंतर माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच सर्वात जास्त नगरसेवक हे राष्ट्रवादीचे निवडून आले होते आणि येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत संख्या वाढून सत्ता आपल्या हातात येणार आहे. तसेच यंदाची नगराध्यक्षपदाची निवडणुक हि थेट जनतेतून होणार असल्याने कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे. असे मार्गदर्शन राष्ट्रवादीचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांनी केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!