ठाणे

अंबरनाथच्या नेहरू गार्डनचे होणार लवकरच सुशोभिकरण

 
 बालदिनानिमित्त शहरवासीयांना नगराध्यक्षांची भेट
 
अंबरनाथ दि. १४ (नवाज अब्दुलसत्तार वणू) अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात असलेल्या नेहरू गार्डनचे लवकरच सुशोभिकरण करण्यात येणार असून ही शहरवासीयांना आमच्यातर्फे बालदिनाची भेट असणार आहे, असे प्रतिपादन अंबरनाथच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर यांनी केले.
          खूप दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नेहरू गार्डनच्या सुशोभिकरण कामाचा आराखडा तयार झाला असून तो लवकरच अमलात आणला जाणार आहे, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदर विषय अगोदरच पारित झालेला असून आता लवकरच प्रत्यक्ष कामाची सुरुवात होणार आहे, गार्डनमध्ये दक्षिण भारतातील कलेनुसार दगडी वास्तू शिल्पकला असलेले विविध पुतळे बसवून गार्डनला वेगळेच स्वरूप देणार असल्याची माहिती नगराध्यक्षा मनीषा वाळेकर व नगरसेवक ऍड. निखिल वाळेकर यांनी यावेळी दिली, तसेच बालदिनानिमित्त नगरपालिका क्षेत्रात आज जन्मलेल्या सर्व बालकांसाठी त्यांच्या मातांना एक वर्ष “सकस आहार” पालिकेतर्फे देण्यात येणार असल्याचा निर्णय पालिकेच्या महिला व बालकल्याण समिती तर्फे घेण्यात आल्याचे ही नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी सांगितले, याप्रसंगी स्थानिक नगरसेविका ज्योत्स्ना भोईर हे ही उपस्थित होत्या.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!