डोंबिवली ( शंकर जाधव ) शिक्षणाचे हे बीज लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे महत्त्वाचे आहे. ही गरज ओळखून दरवर्षी ईगल ब्रिगेड फाऊंडेशन शालेय विद्यार्थ्यांना सहकार्य करत असते. यावर्षी देखील बालदिनाचे औचित्य साधून ईगल ब्रिगेड फाउंडेशन चे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली डोंबिवलीतील बाल विकास मंदिर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वस्तूंना अभावी शिक्षणात बाधा येऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दरवर्षी ईगल ब्रिगेड फाउंडेशन अशा विद्यार्थ्यांना वस्तू वाटप करत असते.
या प्रसंगी शाळेतून बोरसे सर व शिक्षकवर्ग उपस्थित होता. ईगल ब्रिगेड सदस्य संकेत कर्डेकर, संजय गायकवाड, मंदार लेले, शंतनु सावंत, अनुप इनामदार व इतर सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.