मुंबई

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या समाजकार्य विभागात सावित्रीबाई फुले व बाया कर्वे पुस्तकपेढीचे उदघाटन

मुंबई – एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या समाजकार्य विभागात सावित्रीबाई फुले व बाया कर्वे पुस्तकपेढीचे उदघाटन एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या मा. कुलगुरू, डॉ.शशिकला वंजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी मा. कुलगुरू,डॉ.शशिकला वंजारी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला तसेच त्यांनी सावित्रीबाई फुले व बाया कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणाकरिता दिलेल्या सामाजिक योगदानाविषयीची आठवण करून दिली.

प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एक पुस्तक या पुस्तकपेढीला दिले तर नक्कीच हि पुस्तकपेढी समृद्ध होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला. ह्या उदघाटन प्रसंगी विभाग प्रमुख डॉ.आशा पाटील यांनी प्रास्ताविक केले. समाजकार्याच्या विद्यार्थिनींना आवांतर वाचनसाठी ह्या पुस्तकपेढीचा नक्कीच उपयोग होईल तसेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हि पुस्तके एक सोबती म्हणून कायम साथ देतील असे नमूद केले.

या उदघाटन प्रसंगी प्रा.डॉ.रोहिणी सुधाकर, प्रा.डॉ. प्रभाकर चव्हाण, प्रा.अंशीत बक्षी तसेच विभागातील  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हि पुस्तकपेढी सुरु होण्यासाठी श्री.अनिल चव्हाण, श्रीमती.श्वेतांबरी पटेकर,चेतन पटेकर तसेच त्यांच्या अन्य सहकार्यांनी मोलाची मदत केली असे विभागाचे सहाय्यक प्रा. श्री. अमेय महाजन यांनी नमूद केले. भविष्यात हि पुस्तकपेढी समृद्ध होण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असे सामाजिक आवाहन विभाग प्रमुख डॉ.आशा पाटील यांनी केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!