ठाणे

श्रीमंत योगी प्रतिष्ठानतर्फे दिव्यात स्वच्छता अभियान

शिवभक्तांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दिवा,  (बातमीदार) :  सामाजिक उपक्रम राबवण्यात आघाडीवर असलेल्या दिवा येथील श्रीमंत योगी प्रतिष्ठानतर्फे रविवारी सकाळी शहराच्या मुख्य रस्त्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानात प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, शिवभक्तांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना आपला परिसर कायम स्वच्छ ठेवण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले.
प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शशिकांत पाटील आणि अध्यक्ष अरविंद उभारे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अजय चव्हाण, सचिव राहुल कानस्कर, उपसचिव सुधाकर हर्णेकर, खजिनदार राकेश भावे, संकेत चव्हाण, दिनेश सावंत, संभाजी कणसे, संतोष कोंडाळकर, संदीप मोरे, सूर्यकांत म्हाडगुत, बळीराम जाधव, कमलेश मालवणकर, ॠषी सुर्वे, तुकाराम उढंरे, अविनाश भोगले, सुनिल शिर्के आदि सहभागी झाले होते. उपक्रमाला शिवसेना नगरसेवक दीपक जाधव यांनी सहकार्य केले. प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच अनाथ मुलांना मदतीबरोबरच विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमही राबविले जातात.

 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!