गुन्हे वृत्त

5 हजारची लाच घेताना महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

कोल्हापूर दि. 28  : कोडोली येथील महावितरणचा सहाय्यक अभियंता राजेश अनिल घुले (वय वर्षे 43) याला 5 हजारची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले.
राधाकृष्ण अपार्टमेंटमधील 14 सदनिका धारकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. त्याचे बक्षीस म्हणून सहाय्यक अभियंता राजेश घुले यांनी 28 हजाराची मागणी केली. तडजोडी अंती 5 हजाराची लाच स्वीकारताना श्री. घुले हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.
उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलिस काँस्टेबल रुपेश माने यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!