ठाणे

कल्याणातील नागरिकांची मरणोत्तर अवहेलना..

ऑपरेटर जागेवर असल्याने तासभर मृतदेह खोळंबला

डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण लालचौकी येथे असलेल्या स्मशानभूमीवर गॅस शवदाहीनीचा ऑपरेटर जागेवर नसल्याने मृतदेहाला तब्बल तासभर ताटकळत ठेवावे लागले. अखेर तासाभराने महाशय आले त्यांनी विधी पूर्ण करत या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेमुळे स्मार्ट सिटी म्हणून टेंभा मिळविणाऱ्या कल्याण -डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील नागरिकांना मरणोत्तर यातना सहन कराव्या लागत असल्याचे समोर आले .

कल्याण पश्चिमेतील लाल चौकी स्मशानभूमीत आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका ९५ वर्षीय महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी आणला होता. मात्र येथील एल.पी.जी शवदाहिनीचा ऑपरेटर जागेवर नव्हता .मयत महिलेच्या कुटुंबीयांनी या ऑपरेटरला अनेकदा फोन केला. मात्र त्याने फोन उचलला नाही. अखेर त्रस्त कुटुंबीयांनी याबाबत नगरसेवक मोहन उगले यांना माहिती दिली. उगले यांनी प्रशासनाला फोना फोन केला. काही वेळाने या ऑपरेटरने फोन उचलला तासाभराने हे महायशय त्या ठिकाणी दाखल झाले .मात्र यादरम्यान मृतदेहाला तब्बल तासभर ताटकळत ठेवावे लागले.ऑपरेटर आल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले .दरम्यान पालिका प्रशासनाच्या या बेजबाबदार पणामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.प्रामाणिकपणे कर भरून देखील जिवंतपणी मूलभूत सुविधेअभावी नागरिकांना यातना सहन कराव्या लागत असताना मयत झाल्यानंरही या यातना कायम असल्याचे या घटनेवरून दिसून आले .याबाबत संबंधित कर्मचार्यांने मात्र सकाळी याच ठिकानी होतो कामानिमित्त बाहेर गेलो होतो कुटुंबीयांचा फोन आल्यानंतर मी तत्काळ या ठीकानी आलो त्यांचा विधी सुरू होता असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला .तर स्थानिक नगरसेवक मोहन उगले यांनी या ठिकाणी स्मशानभूमीची देखभाल।दुरुस्ती साठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे मात्र या ठेकेदाराकडून स्मशानभूमीच्या परिसरात स्वच्छता राखली जात नाही कर्मचारी वेळेवर कधिच उपलब्ध नसतात त्यांना फोन कडून बोलवून घ्यावे लागते याबाबत अनेकदा पालिका प्रशासनांकडे तक्रारि केल्या मात्र प्रशासन या कडे दुर्लक्ष करत आहे प्रशासनाने ठेकेदाराला समज द्यावी अन्यथा येत्या महासभेत प्रशासनाला जाब विचारु असा इशारा दिला आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!