ठाणे

नेवाळी आंदोलनाचे गुन्हे मागे घ्यावेत

मनसे आमदार प्रमोद पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

डोंबिवली ( शंकर जाधव ) नेवाळी येथील भूखंडाचे सरकारकडून सूरु असलेल्या भूसंपदनाविरोधात २०१७ साली जून महिन्यात शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन छेडले होते यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्याविरोधात गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली होती गेल्या अडीच वर्षांपासून आंदोलक न्यायालयीन हेलपाटे मारत आहेत नेवाळी आंदोलकांवरील गुन्ह मागे घेण्याची मागणी राजकीय पक्ष व संघटना कडून होत आहे .मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विट करत आरे बचाव आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करत नेवाळी आंदोलनात शेतकऱ्यांबर दाखल गुन्हे देखील मागे घेण्यात यावेत अशी मागणी केली आहे .

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश काळात नेवाळी विमानतळासाठी म्हणून अधिग्रहण केलेल्या आणि आता नौदलाने हक्क सांगितलेल्या १७०० एकर शेतजमिनीचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. या जागेवर नौदलाने संरक्षक कुंपन घालन्याचे काम सुरु केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. विमानतळाच्या जागेतील शेतजमिनी परत मिळाव्यात यासाठी कल्याण-मलंग आणि बदलापूर पाईपलाईन रोडलगत असलेल्या नेवाळी येथे २२ जून २०१७ रोजी शेतकऱ्यांनी जमीन बचावासाठी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळन लागले. या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनाची जाळपोळ करत काही पोलीस अधिकरी कर्मचार्यांना मारहाण केली होती. तर पोलिसांनी केलेल्या लाठीमार आणि गोळीबारात काही शेतकरी जायबंदी झाले होते. या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांविरोधात गंभीरस्वरूपाचे गुन्हे दाखल करत आंदोलकांना अटक केली होती .काही महिन्यांनी आंदोलकांची जामिनावर सुटका करण्यात आली असून गेल्या अडीच वर्षांपासून आंदोलकाना न्यायालयीन हेलपाटे सुरू आहेत .याबाबत राजकिय पक्ष ,संघर्ष समितीसह अनेक संघटनांकडून नेवाळी आंदोलन प्रकरनातील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती .मनसे आमदार प्रमोद उर्फ राजु पाटील यांनी देखील या नेवाळी प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून आरे बचाव आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्याबाबत मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद करत नेवाळी मधील शेतकरी आंदोलनच्या वेळेस अनेक शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे सुद्धा मागे घ्यावेत अशी मागनी केली आहे तसेच या प्रकरणी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेनार असल्याचे सांगितले .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!