ठाणे

प्रदूषण नियंत्रण मंडळाची ऑनलाईन परवाना माहिती परिषद संपन्न ..

डोंबिवलीतील सुमारे १५० कंपन्या सहभागी ..

डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवाना मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत होते. आता ह्या परवाना मिळवण्यासाठी पारदर्शकता कारभार सुरु झाला आहे.बुधवारी अंबरनाथ येथील एसथ्री हॉटेल येथे पार पडलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाची ऑनलाईन परिषदेत डोंबिवलीतील सुमारे १५० कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव इ रविंद्रन, प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे, कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी ,मुंबईतील सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सदस्य सचिव इ रविंद्रन यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाची ऑनलाईन प्रक्रियेबाबत उपस्थित कंपन्याच्या प्रतिनिधीना माहिती दिली.तर देवेन सोनीही यांनीही थोडक्यात आपले मत व्यक्त केले.महाराष्ट्रात १ लाखापेक्षा जास्त कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची ऑनलाईन परवाना घेणे आवश्यक असते. मात्र यासाठी सरकारी कार्यालयाचे अनेक वेळेला हेलपाटे मारावे लागतात.आता यात सरकारने पारदर्शक कारभार सुरु केल्याने आता कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवाना ऑनलाईन माध्यमातून मिळणार आहे. याबाबतच्या प्रक्रियेची माहिती परिषदेत कारखानदारांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!