गुन्हे वृत्त

इंदिरा चौकात सोनसाखळी चोरट्याला महाविद्यालयीन विद्यार्थाने पडकले…

नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या दिले  ताब्यात ..

 डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील गजबजलेल्या इंदिरा चौकात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळत असताना सोनसाखळी चोरट्याला एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने पाठलाग करून पकडले. ही घटना शुक्रवारी दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास घडली.नागरिकांनी चोरट्याला चोप देत रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्याला पकडणाऱ्या विद्यार्थ्याला अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते प्रशस्त्रीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

योगेश दिनेशचंद्र पांडे ( १९ ) असे सोनसाखळी चोरट्याचे नाव आहे.हा सराईत चोरटा असून यापूर्वीही त्याने डोंबिवली शहरात सोनसाखळी चोरल्या असून त्याला अटक केल्याने अनेक गुन्हांची उकल होण्याची शक्यता आहे.सुजाता धावडे या ज्येष्ठ महिलेच्या फिर्यादीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धावडे या दुपारी इंदिरा चौकातील एका साडीच्या दुकानात जाण्यासाठी आत जात असताना अचानक  सोनसाखळी चोरटा योगेश पांडे याने पाठीमागून त्याच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड करताच महाविद्यालयीन विद्यार्थी सहीन सुरेश कोथीमिरे याने त्याच्या पाठलाग करून त्याला पकडले.आरडा-ओरडा एकूण नागरिकांनीहि त्याच्या पाठीमागे धावले. सुरेशने चोरट्याला पकडले असता चोरट्याने मंगळसूत्र तोंडात कोंबले.सुरेशने त्याच्या पाठीला जोरदार ठोसा मारताच त्याने मंगळसूत्र तोंडातून बाहेर काढले.त्यानंतर नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला.रामनगर पोलिसांना खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी  धाव घेऊन सोनसाखळी चोरट्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले.

सोनसाखळी चोरट्यांचे डोंबिवलीकडे लक्ष….

दोन- तीन वर्षापूर्वी सोनसाखळी चोरटे शहरात धुमाकूळ घालला होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारीकडे लक्ष देत पोलिसांनी गस्त वाढल्याने काही प्रमाणात सोनसाखळी चोरीचे प्रकार कमी झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा सोनसाखळी चोरट्यांनी डोंबिवली शहराला लक्ष केल्याचे दिसते. भरदिवसा रस्त्यावरून पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पळ काढण्याच्या प्रकार सुरु केले. शुक्रवारी गजबलेल्या इंदिरा चौकात सोनसाखळी चोरटा पकडला गेल्याने आता पुन्हा ही टोळी सक्रीय झाली आहे का असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे. 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!