ठाणे

“मोफत आरोग्य शिबीर व संपूर्ण शरीराची तपासणी व डोळ्यांची तपासणी” शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी व सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 
 
अंबरनाथ दि. १३ (नवाज अब्दुलसत्तार वणू)  : अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी व सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा युवक माजी अध्यक्ष मनोज (सुरेश) सिंह यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “मोफत आरोग्य शिबीर व संपूर्ण शरीराची तपासणी व डोळ्यांची तपासणी” शिबिराचे आयोजन अंबरनाथ पश्चिमेकडील संघठन चौक येथे आज करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन येथील स्थानिक नगरसेविका श्रुती सिंह व संघठन बाईजच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. या शिबिराचे उदघाटन अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
           याप्रसंगी नगरसेवक उमेश पाटील, पंकज पाटील, सुरेंद्र यादव, नगरसेविका तथा आयोजक श्रुती सिंह, माजी नगरसेवक नरेंद्र काळे, शिवानंद सिंह, विधानसभा माजी युवक अध्यक्ष मनोज (सुरेश) सिंह, मनीष सिंह यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व संगठन बाईजचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           या शिबिरात ईसीजी, रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांची तपासणी करण्यात आली, ज्या रुग्णांना एनजीओप्लास्टी सर्जरी, किडनी स्टोन सर्जरी, व्होल रिप्लेसमेंट सर्जरी, फॅक्चर सर्जरी, प्रोस्टेट सर्जरी आदी सर्जरी हे रुग्णालयात मोफत करण्यात येणार आहे. तसेच आज आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती नगरसेविका श्रुती सिंह यांनी सांगितले.
                  आरोग्य सुविधा केंद्र सुरु
स्व. राजाराम सामाजिक संस्था (रजि.) बुवापाडा अंबरनाथ यांच्या वतीने “आरोग्य सुविधा केंद्र (OPD)” सुरु करण्यात आलेले असून या केंद्राचे हे उदघाटन प्रदीप नाना पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. हे केंद्र दुपारी १२:३० ते ३:३० वाजेपर्यंत सुरु राहणार असून फक्त रु. २० मध्ये तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहे, तर बाहेरील औषधांवर २५ टक्के सूट देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!