डोंबिवली ( शंकर जाधव ) देशातील अनेक समस्यांवर आवाज उठवत कॉंग्रेसने केंद्रातील भाजप सरकारवर टीका करत निदर्शने केली.पण डोंबिवलीत मात्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईला घाबरून काही मिनिटात निदर्शने उरकली.पोलिसांनी निदर्शनला परवानगी नाकरूनही ही काँग्रेसने निदर्शने केल्याने आता कारवाईला सामोरे जाण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी तयार नव्हते.निदर्शनात हाताच्या मोजकेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
डोंबिवली पूर्वेकडील काँग्रेस कार्यालयाजवळ सायंकाळी ७ पदाधिकारी जमा झाले.यावेळी पदाधिकाऱ्यांमध्ये निदर्शने करण्यात एकमत नव्हते.काही पदाधिकारी निदर्शने केल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल म्हणून निदर्शने नकोत असे सांगत होते.मात्र काही वेळाने चर्चा होऊन पदाधिकाऱ्यांनी बॅनर घेऊन निदेशने केली.या निदर्शनात भाजप सरकार विरोधात एकही घोषणाबाजी न करता पदाधिकारी इंदिरा चौकात आले.त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काही क्षण थांबून लगेच निघून गेले.यावेळी एकही पदाधिकारी बोलण्यास तयार नव्हता.इंदिरा चौकात रामनगर पोलीस आलेले पाहून पदाधिकारी त्याठिकाणाहून निघून गेले.यातील एका पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अडवून परवानगी नसताना निदर्शने का केली असा प्रश्न केला.मात्र त्या पदाधिकाऱ्याला याचे उत्तर देता आले नाही.विशेष म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता राज्यात असताना काँग्रेसने डोंबिवलीत निदर्शने करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा घेतला होता.परंतु समोरच उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या निदर्शनात सहभागी होण्यास तयारी दर्शविली नाही.
डोंबिवलीत पोलिसांच्या कारवाईला घाबरून काँग्रेसने काही मिनिटात निदर्शने उरकली …. निदर्शनात मोजकेच पदाधिकारी
