ठाणे

जिल्हयातील अंगणवाडया होत आहेत स्मार्ट

जिल्हा परिषद, ठाणे व लायन्स क्लब जूहू यांच्या संयुक्त विदयमाने उपक्रम

ठाणे दि १४ जानेवारी २०२० : महिला व बाल विकास ,जिल्हा परिषद,ठाणे व लायन्स क्लब जुहू यांच्या संयुक्त विदयमाने जिल्हयात स्मार्ट अंगणवाडी  योजनेतंर्ग   जिल्ह्यातील अंगणवाड्या  स्मार्ट करण्यात येत आहेत. नुकतेच भिवंडी तालुक्यातील काटई-दिवानमाल,काटई ,कांबा,जूनांदुर्खी,राईपाडा व चिंबिपाडा या सहा अंगणवाडया स्मार्ट झाल्या.

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट अंगणवाडी उपक्रम राबविण्यात येत आहे.

भिवंडीत झालेल्या कार्यक्रमा दरम्यान  लायन्स क्लब जुहूच्या अध्यक्ष दर्शना कोठारी, पंचायत समिती सदस्य गजानन आसवरे, शैलेश शिंगोले , बाल विकास प्रकल्प अधिकारी बालाजी कोरे, ग्रामपंचायत सदस्य राम मोरघा,  विस्तार अधिकारी विकास वेखंडे , पर्यवेक्षिका सुलभा अडसुळे  इ. अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते. तर लायन्स लब जुहू यांच्याकडून सेक्रेटरी भरत शहा, ट्रेझरर पंकज शहा ,किरीट दोषी, शंभूभाई त्रीवेदी इ. सदस्य उपस्थित होते.

लायन्स क्लब ,जुहू  मार्फत निवडलेल्या अंगणवाडयांमध्ये छत दुरूस्ती, भिंतीची दुरूस्ती व रंगरंगोटी,किचन प्लॅटफॉर्म, दरवाजा- खिडकी दुरूस्ती ,आतीत व बाहेरील भिंतीवर आकर्षक व बोलक्या भिंतीची सजावट तसेच अंगणवाडयामधील लाभार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाठी उपयुक्त साहित्य (शैक्षणिक तक्ते, सॅनिटरी नॅपकीन, ब्लँकेट इ.) अशा वैविध्यपूर्ण व उपयुक्त वस्तूंचा पुरवठा व व्यवस्था करण्यात आली आहे.

अंगणवाडयांचा दर्जा सुधारण्याकरीता स्मार्ट अंगणवाडी उपयुक्त आहे. ठाणे जिल्हयातील 30 अंगणवाडयांचे  स्मार्ट अंगणवाडीत रूपांतर करण्यात आलेले आहे. सन 2020 या वर्षात जास्तीत जास्त अंगणवाडया स्मार्ट करण्याचे उददीष्ट आहे.  असे महिला व बाल कल्याण समिती सभापती सपना भोईर यांनी सांगितले. तर महिला व बाल विकास विभागाच्या बहुतांश सेवा अंगणवाडीच्या माध्यमातून दिल्या जातात. बालकांच्या जन्मपुर्व अवस्थेपासून किशोरावस्थेपर्यंत अंगणवाडी हा बालकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. अशा अंगणवाडया भौतिकदृष्टया अदयावत केल्याने बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता त्याची उपयुक्तता वाढण्यास मदत होते. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी,महिला व बाल विकास विभाग  संतोष भोसले यांनी सागितले. यावेळी लायन्स क्लब जुहूच्या अध्यक्ष दर्शना कोठारी म्हणाल्या की  जिल्हा परिषद ठाणे यांच्या सहयोगाने लायन्स क्लब स्मार्ट अंगणवाडी हा स्तुत्य उपक्रम राबवित आहे. ज्याचा फायदा अंगणवाडीमध्ये येणा-या सर्व प्रकारच्या लाभार्थ्याना होणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!