ठाणे

नांदिवली तलावाजवळील ७ मजली अनधिकृत इमारतीवर दिखाव्याची कारवाई

डोंबिवली : (शंकर जाधव ) पालिकेच्या `ई`प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत असलेल्या नांदिवली तलावाजवळील ७ मजली अनधिकृत इमारतीवर पालिका प्रशासनाने दिख्याव्याची कारवाई केली.त्यामुळे पालिकेच्या या कारवाईबाबत  डोंबिवलीकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.प्रभाग क्षेत्र अधिकारी रविंद्र गायकवाड यांनी या इमारतीवर योग्य कारवाई केली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.नांदिवली तलावाजवळील ७ मजली अनधिकृत इमारतीवर दोन वर्षापूर्वी पालिका प्रशासनाने कारवाई केली होती.मात्र त्यानंतर पुन्हा विकासकाने पालिकेला आव्हान करत इमारतीचे काम सुरु केले.प्रशासनाने या बांधकामाकडे जाणीवपूर्वक लक्ष न दिल्याने विकासकाने ७ मजली इमारती उभी केली. धातुर-मातुर कारवाई करण्यासाठी शनिवारी`ई`प्रभाग क्षेत्र अधिकारी रविंद्र गायकवाड हे कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तात कारवाईसाठी गेले होते.परंतु इमारतीच्या काही भीती तोडून प्रभाग क्षेत्र अधिकारी गायकवाड आणि कर्मचारी परत आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!