ठाणे

पालिका अधिकाऱ्यांच्या मनमानी कामकाजाला कंटाळून आत्मदहन करण्याचा इशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) येथील एका धार्मिक स्थळाच्या अनधिकृत वाढीव बांधकामांवर पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने सामाजिक कार्यकर्ता महेश निंबाळकर यांनी शनिवारी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यलयात आंदोलनासाठी आले होते. मात्र पोलीसांनी आंदोलन करण्यास मनाई केली असता निंबाळकर यांनी यापूर्वी सहा वेळा आंदोलन करूनही पालिका प्रशासन कारवाई करत नाही यामागचे काय कारण आहे ? असा प्रश्न उपस्थित केला. पालिका अधिकाऱ्यांच्या मनमानी कामकाजाला कंटाळून आत्मदहन करीन असा इशारा यावेळी त्यांनी दिला. निंबाळकर आणि पोलीस कर्मचारी यांच्यात काही वेळ चर्चा झाल्यावर प्रशासनाने त्यांना कारवाई करू असे लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतले.

    एका धार्मिक स्थळाच्या अनधिकृत वाढीव बांधकामांबाबत सामाजिक कार्यकर्ता महेश निंबाळकर यांनी पालिका प्रशासनाला वारंवार पत्र दिले होते. डोंबिवली विभागीय कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले होते.तर गेल्या वर्षी  २६ जानेवारी रोजी निंबाळकर यांनी विभागीय कार्यलयात आंदोलन केले होते. मात्र तरीही प्रशासनाने कारवाई केली नाही असा आरोप त्यांनी केला आहे. शुक्रवारी `फ`प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही ऐनवेळी शिंदे आले नसल्याने कारवाई झाली नाही. निंबाळकर यांनी शिंदे यांची वाट पहिली मात्र प्रशासनाकडून काहीही हालचाल होत नसल्याने अखेर त्यांनी शनिवारी दुपारच्या सुमारास डोंबिवली विभागीय कार्यालयात आंदोलन करण्याचे ठरविले. शानिवारी निंबाळकर आले असता रामनगर पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यास मनाई केली. पोलीसांची दडपशाही पुढे नमणार नाही असे सांगत त्यांनी प्रशासन का समोर येत नाही असा जाब विचारला. काही वेळा वातावरण तापल्यानंतर करनिर्धारक वाघचौरे यांनी निंबाळकर यांनी पुढील कारवाईचे पत्र दिले. त्यानंतर निंबाळकर यांनी आपले आंदोलन घेतले. दरम्यान या अनधिकृत वाढीव बांधकामावरील कारवाईच्या  चालढकलीमागे कोण आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

   अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊ नये म्हणून पोलिसांनाही दिल्लीतून फोन येतो का ?

  कल्याण – डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामे तोडू नये म्हणून दिल्लीतून फोन येतो असे धक्कादायक वक्तव्य अनधिकृत बांधकाम उपायुक्त लक्ष्मण पाटील यांनी पत्रकारांसमोर केले होते. आता पोलिसांना दिल्लीतून फोन येतो का असा प्रश्न आदोलन करण्याच्या वेळी महेश निंबाळकर यांनी पोलिसांना विचारला. मात्र पोलिसांना याकडे फारसे लक्ष दिले नाही.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!