डोंबिवली ( शंकर जाधव ) ४ जानेवारी रोजी स्थायी समितीच्या सभापतीच्या भाजपचा विजय झाला होता. कॉंग्रेस आणि मनसेने मदत केल्याने भाजपचा सभापती बसल्याने हा महाआघाडीला केडीएमसीच्या राजकरणात पहिला धक्का बसला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्हीप बजावूनही कॉंग्रेसचे नगरसेवक नंदू म्हात्रे यांनी उलघ्घंन केल्याने पक्षाने त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे नंदू म्हात्रे यांना गटनेते पदावरून हकालपट्टी करून गटनेतेपदी नगरसेविका दर्शना शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आल्याचे कल्याण जिल्हाअध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले.कॉंग्रेसच्या सदस्यांनी शिवसेनेचे गणेश कोट यांना मतदान करायचे होते.परंतु प्रत्यक्षात भाजपचे विकास म्हात्रे यांना मतदान केले. त्यामुळे हर्षदा भोईर यांनी व्हीप न मानता भाजपाला मतदान केले. हा व्हीपचा आदेश झुगारल्याने कोकण उपायुक्तांकडे त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्यासाठी रिट पिटीशियन दाखल करणार सचिन पोटे यांनी सांगितले.तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे.पक्षविरोधात गेल्यास कारवाई करू असेही पोटे म्हणाले.
कॉंग्रेस गटनेतेपदी नगरसेविका दर्शना शेलार यांची नियुक्ती
January 20, 2020
35 Views
1 Min Read

-
Share This!