ठाणे

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात पाळणाघराची सुविधा करा – भाजप महिला संघटनेची मागणी

कल्याण  (  शंकर जाधव ) मुलाचा सांभाळ करण्यासाठी पाळणाघराची मागणी वाढत आहे .नोकरदार महिलाना करिअर आणि घर दोन्ही सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते .या धावपळीतून महिलाना दिलासा देण्यासाठी कल्यान रेल्वे स्थानक परिसरात पाळणा घर सुरू करण्याची मागणी भाजपा शहर महिला संघटनेतर्फे पालिका आयुक्तांकडे करण्यात आली .याबाबत भाजपच्या कल्याण शहर महिला अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांनी पालिका आयुक्तासह खासदार कपिल पाटील व रेल्वे स्टेशन प्रबंधकाना निवेदन सादर करत केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत होणाऱ्या विकास योजने अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे याच वेळी स्टेशन परिसरात पाळणा घराची व्यवस्था करण्यात यावी त्यामुळे नोकरदार महिलावर्गाला दिलासा मिळेल अशी मागणी केली आहे .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!