ठाणे

मांगुर माशाची शेती करणाऱ्यावर गुन्हा दाखल

ठाणे दि. ७ — मांगूर जातीच्या माशांची बेकायदेशीर शेती केल्या प्रकरणी भिवंडी तालुक्यातील सारीगाव आसनोली येथील आदेश भोईर यांच्या विरूध्द गणेशपुरी पोलिसठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असुन बेकायदेशीर मत्स्यसाठा नष्ट करण्यात आला आहे. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय ठाणे यांनी आज ही कारवाई केली.

राष्ट्रीय हरित लवाद यांनी मांगुर माशाच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. मांगुरचे उत्पादन घेतांना माशांना कोंबड्यांचे, कत्तलखान्यात कुजलेले शेळी-मेंढी गाई-म्हशी इत्यादींचे खाद्य म्हणून वापरले जाते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते व हा मासा मानवी प्रकृती घातक आहे. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवाद यांनी 22 जानेवारी 2019 च्या निर्णयाद्वारे बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यात मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी मागूर मत्स्य उत्पादक व मत्स्य वाहतूक करणारे यांच्यावर कारवाई तसेच मागुर माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे  नष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय आयुक्त राजिव जाधव यांच्या आदेशानुसार प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात येत आहे.

बेकायदेशीर शेती करणार्‍या या ठिकाणी मत्स्य विभागातील अधिकार्‍यांनी भेट देऊन शेती नष्ट करण्याची नोटिस दिली होती . मात्र तरीही याकडे दुलर्क्ष करून शेती सुरूच ठेवण्यात आल्याने मत्स्य विभागाने आज कारवाई केली.

सहाय्यक आयुक्त ठाणे अजिंक्य पाटील यांनी सांगितले की, मांगूर माशांची शेती करण्यावर भारतातच कायद्याने बंदी आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात अनधिकृतपणे मत्स्य शेती करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.तसेच कडक कारवाई करण्यात येणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!