ठाणे

सुलोचना गोवळकर यांना आदर्शमाता पुरस्कार प्रदान

ठाणे : अखिल महाराष्ट्र कुणबी समाज सेवा संघ पुणे यांच्या मार्फत देण्यात येणारा या वर्षीचा आदर्श माता पुरस्कार अध्यक्ष महादेव मेंगे,कार्याध्यक्ष संजय खोपटकर,उपअध्यक्ष चंद्रकांत अवेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुलोचना गोवळकर यांना प्रदान करण्यात आला.या वेळी पुणे शहरातील अनेक समाज बांधव उपस्थितीत होते.

आदर्शमाता म्हटले की, राष्ट्रमाता जिजाऊ चेहरा डोळ्यासमोर येतो .त्यांनी शिवाजी महाराज यांना घडवले. म्हणून स्वराज्यांची निर्मिती झाली तसेच या माऊलीने आपल्या मुलांना घडवल. प्रत्येक माता आपल्या मुलाला शिक्षण ,पालन पोषण करत असते .पण समाज प्रबोधनाचे धडे खुप कमी माता देतात.या माऊलीने आपल्या मुलांना शिक्षणाबरोबर समाज प्रबोधनाचे धडे दिले.पती यशवंत गोवळकर हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत.तेही आपला पुर्णवेळ समाजसेवत घालवतात .समाज कार्यामध्ये मुलगी स्वाती हीचे मोठे सहकार्य असते.
आज त्यांची मुले सचिन गोवळकर,संदिप गोवळकर,शासकीय नोकरीत चांगल्या पदावर काम करत आहेत.आपला मोकळा वेळत समाज प्रबोधनाचे काम करत आहेत.फुले,शाहू आंबेडकरांचे विचार समाजात रुजवत आहेत.अंधश्रध्दा निर्मूलनामध्ये काम खुप जोमाने करत आहेत .त्यामुळे समाजात अनिष्ठ रुढी ,पंरमरामध्ये सुधारणा करुन समाज सुधारणेच काम करत आहेत.या कामाची नोंद घेऊन या माऊलीला आदर्श माता पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.सुलोचना गोवळकर यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!