ठाणे

लोकलमधील लॅपटाॅप चोरटे जेरबंद…

डोंबिवली ( शंकर जाधव ) रेल्वे गाडीत प्रवास करतना लॅपटाॅप चोरीचे प्रमाण वाढले असून प्रवाश्यांच्या तक्रारीकडे लक्ष देत डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना लॅपटाॅप चोरट्यांना जेरबंद करून बेड्या ठोकल्या. बाजीराव मारुती खतकर ( ४२ ) आणि त्याचा साथीदार दिलीप गजानन कार्लेकर असे चोरट्यांची नावे आहेत. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमरेच्या सह्याने ठाणे रेल्वे स्थानक ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये लॅपटाॅपची सॅगबॅग चोरताना रंगेहात पकडले.अटक चोरट्यांकडून लोहमार्ग पोलिसांनी सुमारे २ लाख ४२ हजार रुपये किमतीचे  सात लॅपटाॅप आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला.चोरट्यांनी लॅपटाॅप विकण्यासाठी कोल्हापूर येथील मित्र  गीरीजानंद सातापा लाड याला दिले होते.त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!