ठाणे

पत्रीपूलाचे काम मे महिन्यात पूर्ण होणार – महापौर विनिता राणे यांची माहिती

कल्याण :  कल्याणकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या पत्रीपुलाचे काम मे महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपने आज पत्रीपुल कामाच्या दिरंगाईवरून शिवसेनेला लक्ष्य करत धरणे आंदोलन केले. त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महापौर राणे यांनी पत्रीपुलाचे काम पूर्ण होण्याची ही नविन तारीख जाहीर केली.

पत्रीपुलाच्या कामाला दिरंगाई होत असल्याचे सांगत आज भाजपकडून पत्रीपुलाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र भाजपचे हे आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी असल्याची टिका करत पत्रीपुलाच्या कामासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच पाठपुरावा करत असल्याचे महापौर राणे यांनी सांगितले. पत्रीपुल उभारण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचेही त्या म्हणाल्या.

तर पत्रीपुलाचे श्रेय घेण्यासाठी भाजप आज आंदोलन करीत आहे. या पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सतत पाठपुरावा करत आहेत. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांनी पत्रीपुलाच्या कामाची कधी पाहणी तरी केली का? श्रीकांत शिंदे यांच्याऐवढीच कपिल पाटील यांचीही जबाबदारी आहे मात्र त्यांनी काय केलं? असा खडा सवाल सभागृह नेते प्रकाश पेणकर यांनी यावेळी केला.

दरम्यान कल्याण डोंबिवलीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका पाहता शिवसेना आणि भाजपमध्ये पत्रीपुलाच्या तारखेवरून राजकारण रंगू लागले आहे. मात्र शिवसेना-भाजपमधील या राजकारणाशी आम्हाला काहीही घेणं देणं नसून आम्हाला पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!