महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रकल्प राबविण्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई, दि. 4 : पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी चिकू बागेच्या आणि मोगरा लागवडीसाठी विशेष प्रकल्प राबविण्याचे निर्देश कृषिमंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

सन 2019 मधील खरीप हंगामातील झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक विधानभवन येथे झाली.

हवामानावर आधारित चिकू बागेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी योजना राबवाव्यात.  पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी काजू प्रक्रिया उद्योग उभारावे. शेतकरी केंद्रभूत ठेवून योजना राबवाव्यात, असे निर्देश श्री.भुसे यांनी दिले. तसेच विमा रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार राजेंद्र गावित, कृषी विभागाचे अवर सचिव निला शिंदे, मुख्य सांख्यिकी अधिकारी उदय देशमुख, ठाणे विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!