ठाणे

निवृत्ती वेतन धारकांनी राष्ट्रीयकृत बॅंकेमध्ये खाती उघडण्याचे आवाहन

ठाणे दि.16  :राज्य शासन निर्णयानुसार सर्व निवृत्ती वेतन धारकांनी राष्ट्रीयकृत बॅंकामध्येच त्यांची खाते उघडणे आवश्यक आहे.तरी ठाणे जिल्ह्यातील ज्या निवृत्तीवेतन धारकांची खाती राष्ट्रीकृत बॅंकांमध्ये नाहीत त्यांनी जिल्हा कोषगाराशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा कोषगार अधिकारी राजेश भोईर यांनी केले आहे.

निवृत्तीवेतन धारकांनी शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यांची बॅंक खाती त्यांच्या सोयीच्या दृष्टीने खाजगी अथवा सहकारी क्षेत्रातील बॅंकामध्ये उघडली आहेत.परंतू निवृत्तीवेतन बॅंक खाती राष्ट्रीयकृत बॅंकामध्येच उघडणे आवश्यक आहे.राष्ट्रीयकृत बॅंकाची यादी खालील प्रमाणे

भारतीय स्टेट बॅंक,सिंडीकेट बॅंक,बॅंक ऑफ बडोदा,कॉर्पोशन बॅंक,आलाहाबाद बॅंक,इंडियन बॅंक,बॅंक ऑफ महाराष्ट्र,बॅंक ऑफ इंडिया,पंजाब नॅशनल बॅंक,सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया,आंध्रा बॅंक,युनियन बॅंक ऑफ इंडिया,इंडियन ओव्हरसीज बॅंक या बॅंकामध्ये निवृत्ती वेतन धारकांनी आपली खाती उघडावी

तसेच नवीन उघडलेल्या निवृत्तवेतन बँक खात्याच्या पास बुकच्या प्रथम पृष्ठाची झेरॉक्स प्रत,आधार कार्ड,पॅनकार्ड च्या प्रती व मोबाईल नंबर कोषगार कार्यालयात जमा करावे जेणकरुन सदर माहिती निवृत्तवेतन प्रणालीमध्ये अध्यावत करता येईलअसे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ठाणे राजेश भोईर यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!