ठाणे

महाराष्ट्रातील धनगर समाजासाठी घरकुल योजना

२५ मार्च पर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन

ठाणे दि.16 : महाराष्ट्रातील भटक्या व विमुक्त जमातीमधील धनगर समाजातील लोकाचा सर्वागीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णय अन्यये ग्रामीण भागातील धनगर समाजातील लोकांसाठी दहा हजार वैयक्तिक लाभार्थी घरकुल बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.

सदर योजनेसाठी जातीचा दाखला, आधार कार्ड, १ लाख रुपयाच्या आतील उत्पन्नाचा दाखला, नमुना न. ८ स्वत:च्या मालकीची जागा, यापूर्वी महाराष्ट्रात कुठेही घरकुलाचा लाभ घेतला नसल्याचे १०० रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, विहित नमुन्यातील अर्जासोबत जोडून हे अर्ज २५ मार्च, २०२० पर्यंत दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याविषयी अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी पंचायत समिती व जिल्हयाचे सहायक आयुक्त, समाज कल्याण ठाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!