ठाणे

ठाण्यात वृत्तपत्र विक्रेत्यांना केले मास्क चे वाटप

ठाणे  : आज सकाळी ठाणे मध्ये स्टेशन येथे वृत्तपत्र विक्रेत्यांना ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोशियन तर्फे समाजसेवक श्री सुनील काबरा यांच्यातर्फे मोफत मास्क चे वाटप करण्यात आले. सुनील काबरा यांनी आत्तापर्यंत ठाण्यामध्ये 10,000 गरजूंना मास्क चे मोफत वाटप केले.वृत्तपत्र विक्रेते हे ऊन पाऊस वारा काही असलं तरी वेळेवर वृत्तपत्र पोहोचवत असतात. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वास्थ्य चांगले रहावे म्हणून व कोरोनाच्या संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून सर्व विक्रेत्यांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्ता घाडगे, दिलीप चिंचोले, वैभव म्हत्रे, गणेश शेडगे, विवेक ईसामे,समाजसेवक सुनील काबरा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!