महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीत (CSR)व इतर माध्यमातून मदत करावी – आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

मुंबई, दि.21 : कार्पोरेट क्षेत्रातील मान्यवर नेहमीच राज्यातील अनेक संकटाच्या वेळी मदतीसाठी पुढे आले आहेत यावेळी ही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी व बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे या अनुषंगाने अन्य कामासाठी कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीत (CSR) व इतर माध्यमातून मदत करण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील कार्पोरेट क्षेत्राने नेहमीच राज्यावर येत असलेल्या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी मदत केली आहे. सध्या देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा वेळी सरकार सर्वस्तरावर प्रयत्न करत आहे. जनता व सर्व क्षेत्रातील लोक सहकार्य करीत आहे त्याचप्रमाणे अशा आपत्तीच्या वेळी कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीत (CSR) व इतर माध्यमातून मदत करावी, असे आवाहन श्री. वडेट्टीवार यांनी केले.

ही मदत कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी/छाननीसाठी सहाय्य, Contact Tracing शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटीलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करणे या साठी असेल असे ही श्री. वडेट्टीवार म्हणाले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!