कोकण नवी मुंबई

कोरोना : कामगारांच्या जीवाशी खेळ सुरूच !

रायगड जिल्हाधिकार्‍यांकडून ६ कंपन्यांना परवानगी

शिरढोण (योगेश मुकादम)  : _जगावर आलेल्या ‘कोरोना’ या जीवघेण्या संकटातून देशवासीयांची सुटका करण्यासाठी सारा देश एकवटला आहे. देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याकडून नागरिकांसाठी दररोज नवनवी नियमावली येत आहे. ‘कोरोना’ संसर्ग होण्याची शक्यता असलेले सर्व उद्योगधंदे बंद करण्यात यावेत, असे सक्‍त आदेश आहेत. तरीही रायगड जिल्ह्यातील 6 कंपन्यांना कामकाज सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी परवानगी दिल्याने रायगडकरांमध्ये संतापाचा सूर उमटत आहे. ‘कोरोना’चा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील आमदारांनी देखील या कंपन्या सुरू ठेऊ नयेत, अशी मागणी केली होती._

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी, जेएसडब्ल्यू डोलवी, जेएसडब्ल्यू डोलवी सिमेंट कंपनी, जेएसडब्ल्यू कंपनी साळाव, रिलायन्स नागोठणे, रिलायन्स पाताळगंगा आणि टेक्नोवा इमेेजिंग या 6 कंपन्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा कामगारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप कामगार करत आहेत. आम्हाला काही दिवस घरीच राहण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या कामगारांनी संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडे केली होती. कामगारांना बळजबरीने कामावर बोलावले जात आहे.

कामगारांनी अनेकदा कंपनी व्यवस्थापनाला बाहेरील परिस्थितीची जाणीव करून दिली. मात्र, आजही मुंबई, नवी मुंबई व इतर ठिकाणाहून तसेच आसपासच्या गावांतून दररोज कामगार या कंपनीमध्ये येत आहेत. यामुळे एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला आणि संबंधित कामगाराच्या संपर्कात कोणी येऊन स्थानिक भागात ‘कोरोना’ पसरल्यास याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!