नवी मुंबई

गावोगावी पोलिसांचे ‘दंडुके’ पोहोचले,  डॉक्टरांचे ‘स्टेथेस्कोप’ पोहोचणार कधी?

घरोघरी जात ‘कोरोना’ संशयितांना शोधण्याची गरज
जंतूनाशक फवारणीची अनेक गावांची मागणी
कोरोना  : ग्रामीण भागाला सापत्न वागणूक
नवी मुंबई   [ योगेश मुकादम ]  :  मुंबई, ठाणे, नवी मुंंबईलगतचा पनवेल परिसर, रायगड जिल्ह्याला ‘कोरोना’चा सर्वाधिक धोका आहे. या जीवघेण्या संकटापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी शहरी भागामध्ये उपाययोजना करण्यात येत आहेत. ‘कोरोना’ संशयितांना शोधून काढण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी घरोघरी जात नागरिकांच्या आरोग्याची चौकशी करत आहेत. मात्र, पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये फक्‍त पोलिसांचे दंडुकेच ग्रामस्थांवर पडत आहेत. अनेक गावांमध्ये अद्याप जंतुनाशक फवारणी देखील झालेली नाही. घरोघरी जात ‘कोरोना’ संशयित शोधण्याची गरज आहे. ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागाला सापत्न वागणूक मिळत असल्याची नाराजी नागरिकांमध्ये स्पष्टपणे जाणवत आहे._
रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २६ जण संशयित आढळले असून त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाली होती. रायगड जिल्हा हा मुंबईला लागून असल्याने नागरिकांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने पनवेलसारख्या शहरी भागामध्ये पावले उचलली गेली. मात्र, पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आरोग्य विभाग अजून पोहोचलेला नाही. कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींचा उत्पन्न पुरेसा नाही. तरीही अनेक ग्रामपंचायतींकडून आपापल्या परीने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. रिक्षाला भोंगा लावून जनजागृतीसाठी ओरडून कोरोनापासून मुक्‍ती मिळणार नाही. प्रत्येक गावामध्ये नागरिकाच्या घरापर्यंत रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पोहोचणे काळाची गरज आहे.
 पाच कोटी ३४ लाखांचा तुटपुंजा निधी
_रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ५ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी ४६ लाख रूपये तर उर्वरित ४ कोटी ८८ लाख रूपये जिल्हा सरकारी रुग्णालयांसाठी देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाकडून देण्यात आली. रायगड जिल्ह्याच्या अंतर्गत १५ तालुके येतात. मागील जनजगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २६,३४,२०० एवढी होती. त्यामुळे हा निधी अपुरा पडणार आहे. कोरोनाला पळवून लावण्यासाठी सरकारने रायगडकरांसाठी विशेष निधी देण्याची गरज आहे.
प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचले तरच‘लॉकडाऊन’ला यश
_जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून प्रत्येकाची तपासणी झाली तरच हे २१ दिवसांचे लॉकडाऊन यशस्वी होऊ शकेल. या काळावधीमध्ये जंतुनाशक फवारणी व इतर उपाययोजना देखील होणे अपेक्षित आहेत. अन्यथा ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थेच होऊ शकते.  ग्रामीण भागामध्ये गावागावांत फक्‍त पोलिसच दिसत आहेत. आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष पोहोचणार कधी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!