ठाणे

कोकण विभागात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित            विभागीय महसूल आयुक्त श्री.शिवाजी दौंड 

  नवी मुंबई, दि.1: निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या कोकण विभागातील 200 जण आढळून आले आहेत. त्यांचा शोध झाला असून उर्वरित लोकांची माहिती घेण्यात येत आहे. असे कोकण विभागीय महसूल आयुक्त श्री.शिवाजी दौंड यांनी सांगितले.
श्री.शिवाजी दौंड म्हणाले की, निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात कोकण विभागातील 200 जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 139, रायगड जिल्ह्यातील 42, रत्नागिरी जिल्ह्यातील 3, पालघर जिल्ह्यातील 16 यांचा समावेश आहे.
प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील काही लोक  बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे, तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. कोकण विभागात 290 कामगार छावण्या असून 30 हजार लोकांना सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्यांना वैद्यकीय सुविधेसोबतच निवारा आणि भोजनाचीही सोय करण्यात येत आहे. कोकण विभागात होणारे सर्व मोठे समारंभ रद्द करण्यात यावेत. अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोकण विभागात 3 महिने पुरेल असा धान्यसाठा उपलब्ध आहे. असे त्यांनी सांगितले. वृध्द व अपंग व्यक्तींसाठी काम करणा-या कामगारांसाठी पासेस देण्याची व्यवस्था स्थानिक पातळीवर करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. छावणीत ठेवण्यात आलेल्या परप्रातींयाना आवश्यक त्या सुविधा देण्याच्या सूचना ही प्रशासकीय पातळीवर करण्यात आल्या आहेत. त्यात महिला व मुलांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये. यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत..

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!