ठाणे

साथथरोग निर्मुलनासाठी केडीएमसीला आवश्‍यक ती सर्व मदत करणार- पालकमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण  : एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्‍हा
महापालिकेला साथरोग निर्मुलनासाठी आवश्‍यक ती सर्व मदत करणार असे आश्‍वासन ठाणे जिल्‍हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
महापालिका स्‍थायी समिती सभागृहात, सध्‍या सर्वत्र पसरत चाललेल्‍या कोरोना साथीबाबत प्रतिंबंधात्‍मक उपाययोजना करण्‍यासंदर्भात संपन्‍न झालेल्‍या आढावा बैठकीत त्‍यांनी हे आश्‍वासन दिले. महापालिकेने फवारणी कामगारांना मास्‍क, हॅण्‍डगलोज, सॅनीटायझर इ. आवश्‍यक सामुग्री पुरवावी असे निर्देश त्‍यांनी यावेळी उपस्थित अधिका-यांना दिले.
महापालिका सध्‍याच्‍या परिस्‍थीतीत नागरिकांना सेवा देण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातुन अन्सारी चौक, चिकनघर, शास्‍त्रीनगर, ठाकूरवाडी, पाटकर, मढवी, कोळसेवाडी, तिसगाव या आठ ठिकाणी ‘’तापाचे दवाखाने’’ सुरू करत असून सर्दी, कोरडा खोकला, ताप, श्‍वास घेण्‍यास त्रास व घसादुखी यासारखी लक्षणे असलेल्‍या व्‍यक्‍तींनाच या क्लिनीक मध्‍ये सकाळी ९.३० ते १.०० या वेळेत जाऊन तपासणी करून घेता येईल अशी माहिती पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.
जे रूग्‍ण कोरोना बाधित रूग्‍णाच्‍या संपर्कात आले परंतू त्‍यांना कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत अश्‍या रूग्‍णांना शास्‍त्रीनगर रूग्‍णालयात दाखल करावेत व लक्षणे आढळून आलेल्‍या रूग्‍णांस महापालिकेबरोबर संमजस्‍याचा करार केलेल्‍या नियॉन हॉस्‍पीटल, पडले गाव, शिळ रोड, डोंबिवली पुर्व या रूग्‍णालयात दाखल करावे अश्‍या सुचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिल्‍या.
सदर बैठकीस पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे, आमदार विश्‍वनाथ भोईर, आमदार गणपत गायकवाड, आमदार राजू पाटील तसेच विभागीय आयुक्‍त, कोकण विभाग, शिवाजीराव दौंड, ठाणे जिल्‍हाधीकारी राजेश नार्वेकर, नियॉन हॉस्‍पीटलचे डॉक्‍टर सुशिल दुबे, मिलींद शिंदे, डॉ. प्रशांत पाटील अध्‍यक्ष आयएमए कल्‍याण, उप आयुक्‍त (सामान्‍य प्रशासन) विजय पगार, शहर अभियंता सपना कोळी, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. राजु लवंगारे, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, महापालिका सचिव संजय जाधव तसेच महापालिकेचा इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!