ठाणे

अंबरनाथमध्ये “सार्वजनिक बाह्य रुग्ण तपासणी केंद्र” सुरु

सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांसाठी तपासणी केंद्र;
 
अंबरनाथ दि. ०९ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांनी अंबरनाथच्या डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणीकरिता न जाता त्यांनी अंबरनाथ पश्चिमेकडील संजयनगर-खुंटवली येथील ओपीडी व पूर्वेकडील वडवली शाळा येथे सुरु करण्यात आलेल्या “सार्वजनिक बाह्य रुग्ण तपासणी केंद्र” याठिकाणी येऊन मोफत तपासणी करून घ्यावी, सदर तपासणी हि “स्पर्श न करता”  तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी केल्यानंतर ताप असलेल्या रुग्णांना औषधोपचार करण्यात येणार आहे, गरज भासल्यास त्यांची रक्ताची देखील तपासणी करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा. असे आवाहन अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी केले आहे.
          याप्रसंगी अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख, अंबरनाथचे मुख्याधिकारी देविदास पवार,नगरसेवक निखिल वाळेकर, उत्तम आयवळे, आरोग्य विभागाचे प्रमुख सुरेश पाटील, डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयचे प्रमुख डॉ. शशिकांत दोंडे, डॉ. गणेश राठोड, डॉ. उषा माहेश्वरी, डॉ. इनामुद्दीन कुरेशी, डॉ. राहुल चौधरी आदी उपस्थित होते.  
          डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालय येथे ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण तपासणीसाठी आले आणि त्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास रुग्णालयातील स्टाफ क्कारंटाईन करावा लागेल. ज्यामुळे रुग्णालय सेवेवर बंधने निर्माण होतील. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी शहरातील काही नामवंत डॉक्टरांशी चर्चा करून शहराच्या पश्चिम भागातील संजयनगर-खुंटवली येथील ओपीडी व पूर्व भागातील वडवली शाळा या दोन ठिकाणी तपासणी केंद्र ९ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून सुरु करण्यात आलेले आहे. या तपासणी केंद्रासाठी अंबरनाथ मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून १५ डॉक्टरांची नावे उपजिल्हा रुग्णालय आणि नगरपालिका यांच्याकडे देण्यात आली आहेत. तसेच डॉक्टरसोबत नगरपालिका आणि उपजिल्हा रुग्णालयातील एक-एक कर्मचारी वैयक्तिक कक्षात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णाची नोंद ठेवणे आणि इतर कामासाठी मदतनीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. या वैद्यकीय कक्षात तपासाच्या रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे, तर एखाद्या रुग्णाची रक्त तपासणी करण्याची गरज भासल्यास केवळ रक्त तपासणी शुल्क त्या रुग्णाकडून घेतले जाईल. तसेच या रुग्णाला पुढील उपचाराची गरज भासल्यास त्याला ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!