ठाणे

कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रात तब्बल ३३ कोरोनाग्रस्त – दोन महिलांचा मृत्यु तर आठ जण हॉस्पीटलमधून स्वगृही परतले.

डोंबिवली ( शंकर जाधव )  : कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रात  गुरूवारी एकुण ५ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या आता तब्बल  ३३ वर जाऊन पोहचली होती. गुरूवारी सायंकाळपर्यंत कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रात कल्याण पूर्व येथे  दोन महिला सापडल्या आहेत. यातील एक महिला ६२ वर्षीय असून एक महिला ५१ वर्षीय आहे.  तर डोंबिवली पूर्व येथे दोन महिला सापडल्या असून एक २७ वर्षांची तर दुसरी महिला ५६ वर्षांची आहे. डोंबिवली पश्चिम येथे एक महिला सापडली असून ही महिला ५५ वर्षांची असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. ४३ पैकी दोन करोनाग्रस्त  महिलांचा मृत्यु झाला असून ८ रूग्णांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे उपचार घेत असलेले एकुण रूग्ण ३३ असल्याची माहिती पालिकेने दिली. त्यामुळे केवळ डोंबिवली शहरातच २७ जण कोरोनाग्रस्त असून कल्याण येथे १५ आणि टिटवाळ्यात १ अशी कोरोनाग्रस्त रूग्णांची वर्गवारी करण्यात आली आहे.


रिजेन्सी परिसरातील एक रूग्ण घरी परत येत असताना रिजेन्सी संकुलातील सर्व नागरिकांनी त्या महिलेच्या येण्याचे टाळया वाजवून स्वागत केले. त्यामुळे हा एक वेगळा पायंडा या संकुलातील नागिरकांनी पाडला आहे. ज्या राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाबाधीत रूग्णांची हेळसांड केली जात आहे इतकेच नव्हे तर परिचारीकांना देखील सोसयाटीमध्ये राहण्यास मनाई केली जात असताना अशा प्रकारे बरे होऊन घरी परत येणाºया रूग्माचे स्वागत करणे हे कौतुकास्पद असल्याची चर्चा डोंबिवली शहरात रंगली होती.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!