ठाणे

आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध करावी मुख्यमंत्र्यांना  आमदार रवींद्र चव्हाण यांचे पत्र

डोंबिवली  ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेस तातडीने  आरोग्य सेवा उपलब्ध करुध द्याव्यात असे पत्र डोंबिवलीतील आ.रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविले आहे.
 कल्याण डोंबिवली येथे करोना चाचणी करता लँब जास्तीत जास्त सुरु कराव्यात. अहवाल मिळणारी यंत्रणा , करोनाची मोफत चाचणी,  वाढत्या रुग्णांनुसार २हजार खाटांची सोय , महापालिकेची विविध सभागृहे, बंदिस्त मैदाने समाज हाँल शासनाने ताब्यात घ्यावे तसेच  शहरातील  अनेक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात करोनाची चाचणी मोफत करावी. अशी मागणी आ.चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.
    पाच कोटी निधीतून रुग्णालय सुसज्ज करण्याची  आ.रवींद्र चव्हाण यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत करोना रुग्ण संख्या वाढत आहे.यासाठी केंद्राचा पालिकेकडील पाच कोटीचा निधी वापरात आणावा आणि शास्त्री नगर हास्पिटल सुसज्ज करावे  अशी मागणी एका पत्राद्वारे आ.रवींद्र चव्हाण यांनी  आयुक्तांना केली आहे.केंद्राच्या नँशनल अर्बन हेल्थ मिशन या योजने अंतर्गत रु.पाच कोटी सन२०१६साली कल्याण डोंबिवली महापालिकेत जमा झाले. कंडोम पालिकेने चांगले हाँस्पिटल बांधायचे ठरविले परंतु काही लोकांनी मोडता घालून पीपीपी तत्वावर सुतिकागृह बांधायचे ठरवले.केंद्रातून कल्याण डोंबिवली महापालिकेस निधी उपलब्ध झाला आहे या निधीतून  हाँस्पिटल बांधा अशी मागणी आपण  सातत्याने  २०१६ पासून करित आहे.
कल्याण डोंबिवली क्षेत्रात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र  महापालिका अधिनियमानुसार सदरचे पाच कोटीचा निधीतून डोंबिवलीतील पालिकेचे शास्त्रीनगर हॉस्पिटल सुसज्ज करावे ,ज्यामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळेल.अशी मागणी आ..रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!